नाणेघाट ट्रेकिंग मराठी माहिती
नाणेघाट हा २८००
फूट उंचीचा एक डोंगर घाट आहे. मुरबाड च्या थोडं पुढे गेल कि वैशाखरे नावाचं गाव
आहे तिथून च ह्या ट्रेकला सुरवात होते. नाणेघाट हा पुण्यातील जुन्नर तालुक्यात
आहे. नाणेघाट ह्या नावातच च ह्याचा अर्थ आहे "नाणे" म्हणजे नाणं आणि "घाट" म्हणजे पास. डोंगर ओलांडून जाणाऱ्या व्यापाऱ्यांकडून टोल
वसूल केला जाणारा टोल बूथ होता. मौर्य साम्राज्यं आणि सातवाहन वंश यांचं राज्य होत
असा लेण्यांतील शिलालेखांवरून कळून येते.
सातवाहनांनी जुन्नर कडे जाणारा
हा मुख्य मार्ग बनवला होता अस कळून येत. त्यांच्या कार्यकीर्दीत कल्याण आणि सोपारा
ला जोडणारा हा मुख्य मार्ग होता. नाणेघाट प्रमाणे माळशेज घाट आणि बोर घाट हे देखील
महत्वाचे घाट होते. त्यानंतर बाहेरच्या राज्यकर्त्यांनी त्यांचा नाश केला आणि ह्याकडे दुर्लक्ष झालं.
नाणेघाट ट्रेकिंग च्या सुरवातीला थोडासा चालत जावा लागत आणि
मग चढाई ला सुरवात होते. नाणेघाट ट्रेक हा माध्यम दर्जाचा असून एकदम सोप्पा आहे.
टॉप ला जाताना आपल्याला काही मोहक आणि मन प्रसन्न करणारे निसर्ग सौन्दर्य दिसून
येते. हा ट्रेक पूर्ण करण्या साठी साधारण १. ३० ते २ तास लागतात. वर्षात आपण हा
ट्रेक कधीही करू शकतो. टॉप ला गेल्यावर आपल्याला एक कोंकणकडा सुद्धा पाहायला
मिळतो.
पावसाळ्यात तिथे आपण उलटा धबधबा (रिव्हर्स वॉटरफॉल) सुद्धा पाहायला मिळतो. घाट सुरु होण्याच्या आधी आपल्याला
तिथे काही लेण्या देखील दिसून येतात आपण जर रात्रीचा ट्रेक करणार असाल तर तिथे
वास्तव्य करू शकता.
नाणेघाट ला मुंबई किंवा पुण्यावरून कसे जावे.
१. नाणेघाट ला जाण्यासाठी तुम्हाला कल्याण स्टेशन वरून बस
घ्यावी लागते, कल्याण पश्चिमेला
स्टेशन पासून २ मिन च्या अंतरावर बस डेपो आहे.
२. तिथे चौकशी केल्यास कोणती बस जाणार आहे त्या बस ने जावे, नाणेघाट चा असा कोणताही बस स्टॉप नसल्यामूळे थोडे सथर्क
राहावे.( कंडक्टर ला विनंती केल्यास ट्रेक च्या स्टार्ट पॉईंट ला बस थांबवू शकतो)
३. ट्रेक करून झाल्यानंतर परत जाण्यासाठी तश्याच मार्गाचा अवलंब करणे.
- नाणेघाट
ट्रेक ची पातळी - मध्यम
- प्रदेश
- माळशेज घाट
- टॉप ला
जाण्यासाठी लागणार वेळ - जास्तीत जास्त २ ते २.३० तास
- बेस गाव
- वैशाखरे
- कालावधी
- १ दिवस
- नाणेघाट
उंची - साधारण २७०० ते २८०० फूट
- प्रकार
- प्राचीन व्यापारी मार्ग
- खर्च -
३०० ते ४०० रुपये प्रति व्यक्ती
Conclusion
We hope you like the above information. If you have
any questions you can write it down in the comment box or mail us at Mail id
given below.
info.mechtrekk@gmail.com
0 comments: